Monday 13 August 2012

परतून जा...



नको आता काहीच बोलु...
नकोस आता शब्द्फुले तोलु..
क्षण सगळे वाहून गेले..
निरर्थक ओझे उरले..

कोरड्यां शब्दांत आता
शोधू नको अर्थ जराही..
शुष्क रित्या मनातून
मोह अश्रुंनी वाहून गेले...

उजाडणार नाहीच आता.
अंधारात वाट सरणार नाही..
परत असाच टाकून ओझे...
डोळे मी मिटून घेतले...

छाया
१४.८.२०१२

Saturday 11 August 2012

पण रडू नकोस.

आज पुन्हा तपासलं
सर्व कप्पे मनाचे..
मोबाइल मधला इनबॉक्स..
सेंड बॉक्स
आऊटबॉक्स...
अगदी ड्राफ़्टस पण..
निपटारा केला..सगळा..
काय चुकलं
कुठं चुकलं
हिशोब येतं नाही
तरी ताळेबंद मांडला
तु शिकवला तसाच...
काही चुकार गोष्टी..
ज्या नको होत्या व्हायला..
त्या होऊन गेल्या
हळहळ पण करून घेतली..
आसंव काल ढाळंली
आज नको वाटली..
पण एक आहे..
मी चुकले असेन..
थोडी माझ्यालेखी
जास्त तुझ्या लेखी..
पण एक सांगते..
आज तुही..तुझं सांगण ऐक..
आणि ताळेबंद मांड..
हळहळ वाटली तर
तीही करून टाक..
पण रडू नकोस..
ते मला सहन होणार नाही..

छाया
११.८.२०१२

Tuesday 7 August 2012

मी रितीच राहिले..

शब्द फुलांचे भारे
ओटी भरून पाहिले..
बरसला जीव तरी
तरसत मी राहिले..

सुख सुख म्हणत..
दु:ख सोसून पाहिले
काळीज सोलंत सारे..
वेचत मी राहिले..

कसा नाही होत अंत..
नाही नवी सुरुवात..
देह लक्तरांचा माझा
जपतच मी राहिले..

चिंब भिजून शरीरी
जिवा कोरडेचं राहिले..
कुस भरली ना कधी..
मी रितीच राहिले..

छाया 
८.८.२०१२

दु:ख आसवांना फार..

दु:ख आसवांना फार..

दु:ख आसवांना फार
भार सोसे ना पापणीला..
दु:ख आसवांना फार
खांदा नाही विसाव्याला..

दु:ख आसवांचे फार
कढ कढ किती येती..
दु:ख आसवांना फार
मातीमोल होत जाती..

दु:ख आसवांचे फार
हुंदक्यांची साथ नाही..
दु:ख आसवांचे फार
मुके रितेपण साही..

दु:ख आसवांचे फार
कोरड्रया पापण्यांचे झाले
दु:ख आसवांना फार..
पोरकेपण त्यांना आले..

दु:ख आसवांचे फार
गंगा आसवांची रिती..
दु:ख आसवांचे फार
पापण्यांशी तुटे प्रिती..

?
८.८.२०१२

Sunday 5 August 2012

अनोखी.......स्त्री.....

लहू का लाल..
और...दर्द का भी..
धोखा..वह भी तो लाल है..
सिंदूर भी लाल
और लाली भी लाल..
मेहंदी लाल और
अलिता भी लाल..
क्यों कर सुहागनें
लाल के लिए सजती है..
लाल के लिए तरसती है..
नही मिलें तो लाल के लिए
मरती..मारती भी है..
सुहागने..
अपनी ही कोख उजाडती
ये सुहागने..
लाल पाकर धन्य सी
हो जाती है..
दिमाग से लाल रंग छुटता नही..
जब के है वह हरी..
हरी भरी...
प्रकृती जैसी...
निर्माण की अनोखी
शक्ती से भरी..
जीवन से ओतप्रोत..
हरी शाखाओंसे भरपूर..
जीवनदायिनी...
अमृतधारिणी...
अनोखी.......स्त्री......

?
२४.७.२०१२

खुबसूरत



अक्स जिंगदी के पडे जब फ़िके..
वो तो मौत है जो अपनाती है

कोई चाहत है न जरुरत है...
मौत क्या इतनी खुबसूरत है...

जिंदा रहें क्यों बेवजह हम..
जब मौत सोने कि फ़ितरत है..

मौत कि गोद मिल रही हो अगर,
जागे रहने कि क्या जरुरत है..


३१.७.२०१२

मन गोजीरा राणा

मन गोजीरा राणा
मन सोजीरा प्राणा
मन सुख..दुख: फ़ोल
जीवा नाही तुला मोल

मन भरकटले तारु..
मन जाई ना माघारु..
मन फ़ाटले आकाश.
जीवा लागलेला फ़ास..

मन आक्रंदुन जाइ..
मन शोक वाही वाही..
मना खंतावल्या ज्वाळा..
जीवा लागे प्रेतकळा..

मन कल्लोळी जळे..
मन थरकांपी पळे
मन विझलेली चिता
जीवा जारे जारे आता...

?
३०.७.२०१२
शुध्द मूर्खपणा....
जन्माने जात मिळते हा मुर्खपणा...
सर्व महत्व जन्माला....मग कर्माचे काय?
तथाकथित अश्या या जातींना कर्मावर विश्वास नाही का?
मग कर्मामुळे उच्चपदस्थ, समाजमान्य झालेल्यांच्या जातीमुळे...
खरचं का त्यांचे ज्ञान, कार्य विफ़ल ठरते...
हा मुर्खपणा ब्राह्मणांचाही जे जात दाखवतात.. मिरवतात...
मागासांचाही जे सवलतींच्या कुबड्या फ़ेकायला तयार नाहीत
हे सर्वजण सोयीस्करपणे विसरतात....
ज्ञान, बुध्दीमत्ता, विचार हे कोणत्याही एका जातीचे बटीक नाही.
आजच्या फ़ास्ट मुविंग जगाच्या ग्लोबल विलेज मध्ये....
सांगु शकाल का..हो..मी अमुक एका जातीचा आहे...
मग लोक तुम्हांला पायघड्या घालतील..किंवा मग अस्पर्श ठेवतील...
असा असा काहिसा शुध्द गैरसमज झाला आहे का तुमचा?
कधी तुम्ही या जातीपाती सोडणार....पहा जमतयं का...नाहीतर..
राजकारणी तुम्हांला वापरणार आणि गाडुन टाकणार...
आणि तुम्ही त्याच लायकीचे आहात म्हणुन...
तुमच्या साठी कोणी अश्रु ही गाळणार नाही...
होणार या जाती व्यवस्थांचे निर्मुलन होणार....
आणि त्या दिवशी....
तुमचे वंशज थुंकतील तुमच्या या जायीयवादावर...
निर्भत्सना करतील तुमची....हे आज जाणुनच घ्या....
आणि आवरा स्वत:ला...सावरा..
तुम्हांला असा मूर्खपणा करताना पाहिलं
आणि स्वत:ला रोखणं जमलच नाही...
हा सल्ला खुप प्रेमपूर्वक आहे....
आज तुम्हांला पटो वा ना पटो...

नात्यात गाठ

तो असा क्षण येतो...
का येतो...
कसा येतो...
पण येतो खरा...
जीवापाड जपलेल्या नात्यात गाठ पडु पहाते...
ही काही एकाएकी घडणारी गोष्ट नाही...
अनेक घटनांचा परिपाक असंच काही म्हणावं लागेल...
मग असं आहे का... आपण सर्व घटना जमा करत असतो...
मेंदुच्या एका कप्प्यात..
प्रयत्न करत असतो...त्या बाहेर पडु नये...
आपल्याला प्रिय व्यक्तिंपर्यंत पोचु नये...
त्यांच्या मनाला धक्का पोचु नये..
होता होईल तो...ती व्यक्ति सदोदित आपली रहावी...
आपणही त्याच्यातील चांगल्या वाईट गुणांनिशी त्याचेच होउन रहावे...
तरीही मन मात्र अश्या गोष्टींचा साठा करुनच ठेवतो....
ज्या मनाविरुध्द आहेत...
याचा पत्ताच नसतो आपल्याला..
एखाद्या बेसावध क्षणी अचानकपणे....
आपण जी गोष्ट कधीच ओठांवर आणायची ठरवलेलं नसतं...
ती अचानकपणे तोंडातून निघुन जाते..
समोरच्या व्यक्तिला ते अपेक्षित नसतं....
आपणही अवाक...
हे..हे..असं म्हणायचं होतं आपल्याला...
हे..हे..असं कसं बोलुन गेलो आपण..
हे...असं काय बोललो आपण...
प्रश्न...प्रश्न...केवळ प्रश्न...
उत्तर शोधत मनाचे सर्व कप्पे तपासून पहा आता...
शोधा कुठे काही सापडतय का?
मनाच्या तळाशी ब-याच गोष्टी दडलेल्या आहेत...
काढा त्या बाहेर...
स्वत:ला वाटणारा गिल्ट दूर करण्याचा प्रयत्न केला कि ....
मनाला तपासणे सोपं जाईल...
नक्की मिळतील सर्व प्रश्नांची उत्तरं...
प्रश्न निर्माण करणारे जर आपण आहोत....
तर या प्रश्नांची उत्तरेही आपल्याकडेच असणार आहेत...
शोधायला जाताना मात्र मनाची पक्की तयारी ठेवायला हवी आहे...
कोण जाणे काय काय..दडलेलं असेल...
काय काय...हाती लागणार आहे...
अचानकपणे..धक्कादायकपणे..काही समोर आलं तर....
तर ते सहन करण्याचीही तयारी हवी...
जेवढ्या जास्त काळाचा सहवास तेवढाच...
तेवढाच जास्त पसारा आठवणींचा...
निकाली काढायचा म्हटलं तर...
अजुनाधिक त्रासच होणार...
पण म्हणुनच जरुरी आहे...
मनाला वेळच्या वेळी तपासणे...चांगल्या ह्र्द गोष्टींना जपून ठेवणे..
नकोश्या...उगचं जागा व्यापणा-या गोष्टींची वासलात लावणे..
मनाला वळण लावणं...ट्रॅकवर ठेवणं...
काय जपायचं...काय नाही हे मनाला समजवणं...
काय हवं आहे हे सांगणं...
त्या हव्याश्या वाटणा-या सुखद क्षणांच्या आठवणींसाठी स्वर्गिय कोंदण तयार करणं...
म्हणजे मग पुन्हा पुन्हा हे कप्पे शोधावे...उचकावे लागणार नाहीत...
नाही होणार मनाला त्रास...काही बोलुन गेल्याचा...नाही पडणार नात्यात गाठी..
नाही होणार कोंडमारा...मन मुक्त होउन जाईल...
नेहमीच सुखाच्या, आनंदाच्या क्षणांनी ते ओतप्रोत भरलेलं राहील..
उलट... क्षणोक्षणी सुखावून टाकील..

?
१९.७.२०१२



हळव मन..


तु दिलेलं दु:ख जास्त आहे की माझं मनच हळवं आहे..
कोण जाणे..
पण भावनांना अश्रूरूपी बाहेर पडायला मनाई ना दु:खाची आहे ना मनाची..
कोण म्हणतं अभिव्यक्त झाल्यावर मन शांत होतं...ते तर गलबला करतंय..
तडफड कमी व्हायच्या ऐवजी वाढतेचं आहे..
ते अभिव्यक्त होणं चुकीचं का होत...
का चुकीच्या रितीने अभिव्यक्त होत होतं मन..
सार आकालनिय व्हावं... असं का आहे नियतीच्या मनात..
नियतीच्या मनात सर्व अकालनीयच का असावं..
प्रश्नांची उत्तर कधी तरी मिळावित का नाही..
मात्र उत्तर मिळावित असं वाटतं का नाही..
कोणी तरी द्यावीत की नाही..
दिली तरी ती पटतीलच असंही नाही
काहीही झालं तरी मन दु:खाकडेच का धांव घेतं
आपलां हळवे पणा दु:खाकडेच का उघड करतं
त्रास होतोय समजूनही खोलात पाय का रुततं जातोय....
कोण जाणे??????

?
२८.७.२०१२

सुखाचा मोह


सुखाचा मोह माणसाला जगण्याच बळ देत असतो...
म्हणूनचं माझं तुझ्यावरचं प्रेम हे माझ्यासाठी पुरे नाही तर..
तुही एक दिवस मला आपलं म्हणशील...
तुझे हात मला सावरतील...जगण्याचं बळ देतील...
हा मोह मनात बाळगून आहे...
मला माहिती आहे हे होणार आहे..
पण कधी हे माहिती नाही...
हा मोह क्षणोक्षणी आवर्तने घेत असतो मनात..
हे होणार..होणारचं....
हया मोहाने मला जगण्याचं बळ मिळतं रहातं एवढं नक्की..
नाहीतर...नाहीतर खरंच काय प्रयोजन आहे मला जगण्यांच?
मरण्याचं कारण नाही म्हणून?
अरे..पण तसं जगणं तर ...
तसं जगणं तर पशु-पक्ष्यांच जगण झालं ना..
मी हाडांमासांचंच नाही तर भावभावना असलेलं मानवी जीवन जगत आहे...
मग सुखाचा मोह होणं स्वाभाविक नाही का?
आता एक आहे..
जगण्यासाठी प्रयोजन आहे..आणि..
आणि म्हणूनच मी आनंदात आहे.....तुझ्या आठवणींत सुखात आहे...

?
५.८.२०१२

Thursday 2 August 2012

अस्वस्थ मन...

खुप काही वाटतय...
काहीच सुचतं नाही...
भावनांना वाट सापडत नाही...
अस्वस्थ मन...
हाताशी असूनही ....
हाताला काही जाणवतं नाही..
भास होताहेत....आभासी .....
श्वास जाणवतोय कानाशी..
आवाज एकही ऐकू येत नाही...
घनघोर पिसा-यागत...
लाटां उफ़ाळून येतात..
पावले मात्र भिजत नाही..
शून्यभारित मन..
मिटले मन काही..
काही केल्या फ़ुलत नाही
कुंद प्रहरी घाव पडती
थंड ह्र्दयी भाव...
भाव वेदनांचे शमत नाही
कोरडे अश्रू वाहती..
रित्या लोचनांत..ओलं
ओलंपण साठत नाही..
असणं ...नसल्यागत..
टोचतयं..रुततंय..
हात हाती येत नाही...
पाखर पंखाची..
गहिवर मायेचा..
दाटून येतो..देणे होत नाही...

?
२.८.२०१२