Tuesday 7 August 2012

मी रितीच राहिले..

शब्द फुलांचे भारे
ओटी भरून पाहिले..
बरसला जीव तरी
तरसत मी राहिले..

सुख सुख म्हणत..
दु:ख सोसून पाहिले
काळीज सोलंत सारे..
वेचत मी राहिले..

कसा नाही होत अंत..
नाही नवी सुरुवात..
देह लक्तरांचा माझा
जपतच मी राहिले..

चिंब भिजून शरीरी
जिवा कोरडेचं राहिले..
कुस भरली ना कधी..
मी रितीच राहिले..

छाया 
८.८.२०१२

5 comments:

  1. रितेपणानेच पुष्कळ काही भरून जाते हेच खरे!

    ReplyDelete
    Replies
    1. aativas...

      धन्यवाद...

      छाया थोरात

      Delete
  2. Replies
    1. Pradnya...

      धन्यवाद...

      छाया थोरात

      Delete
  3. खूपच छान खुप मार्मिक

    ReplyDelete