Friday, 28 September 2012

निर्माल्य


काळोख्या रात्रीने
गिळून टाकली
स्पर्शाची ती फ़ुलं
सुगंधीत गात्रे
अश्वासक श्वास..
स्पंदन हळुवार
रोमांचित मनं
तमातही मिटलेले
ते स्वप्नाळू नेत्र..
विरघळलेल्या जाणिवा
फ़टफ़टलेल्या
दिवसाला सामोरा
निर्माल्याचा पसारा..

छाया
२९.०९.२०१२

No comments:

Post a Comment