Saturday, 11 August 2012

पण रडू नकोस.

आज पुन्हा तपासलं
सर्व कप्पे मनाचे..
मोबाइल मधला इनबॉक्स..
सेंड बॉक्स
आऊटबॉक्स...
अगदी ड्राफ़्टस पण..
निपटारा केला..सगळा..
काय चुकलं
कुठं चुकलं
हिशोब येतं नाही
तरी ताळेबंद मांडला
तु शिकवला तसाच...
काही चुकार गोष्टी..
ज्या नको होत्या व्हायला..
त्या होऊन गेल्या
हळहळ पण करून घेतली..
आसंव काल ढाळंली
आज नको वाटली..
पण एक आहे..
मी चुकले असेन..
थोडी माझ्यालेखी
जास्त तुझ्या लेखी..
पण एक सांगते..
आज तुही..तुझं सांगण ऐक..
आणि ताळेबंद मांड..
हळहळ वाटली तर
तीही करून टाक..
पण रडू नकोस..
ते मला सहन होणार नाही..

छाया
११.८.२०१२

No comments:

Post a Comment