Sunday, 5 August 2012

नात्यात गाठ

तो असा क्षण येतो...
का येतो...
कसा येतो...
पण येतो खरा...
जीवापाड जपलेल्या नात्यात गाठ पडु पहाते...
ही काही एकाएकी घडणारी गोष्ट नाही...
अनेक घटनांचा परिपाक असंच काही म्हणावं लागेल...
मग असं आहे का... आपण सर्व घटना जमा करत असतो...
मेंदुच्या एका कप्प्यात..
प्रयत्न करत असतो...त्या बाहेर पडु नये...
आपल्याला प्रिय व्यक्तिंपर्यंत पोचु नये...
त्यांच्या मनाला धक्का पोचु नये..
होता होईल तो...ती व्यक्ति सदोदित आपली रहावी...
आपणही त्याच्यातील चांगल्या वाईट गुणांनिशी त्याचेच होउन रहावे...
तरीही मन मात्र अश्या गोष्टींचा साठा करुनच ठेवतो....
ज्या मनाविरुध्द आहेत...
याचा पत्ताच नसतो आपल्याला..
एखाद्या बेसावध क्षणी अचानकपणे....
आपण जी गोष्ट कधीच ओठांवर आणायची ठरवलेलं नसतं...
ती अचानकपणे तोंडातून निघुन जाते..
समोरच्या व्यक्तिला ते अपेक्षित नसतं....
आपणही अवाक...
हे..हे..असं म्हणायचं होतं आपल्याला...
हे..हे..असं कसं बोलुन गेलो आपण..
हे...असं काय बोललो आपण...
प्रश्न...प्रश्न...केवळ प्रश्न...
उत्तर शोधत मनाचे सर्व कप्पे तपासून पहा आता...
शोधा कुठे काही सापडतय का?
मनाच्या तळाशी ब-याच गोष्टी दडलेल्या आहेत...
काढा त्या बाहेर...
स्वत:ला वाटणारा गिल्ट दूर करण्याचा प्रयत्न केला कि ....
मनाला तपासणे सोपं जाईल...
नक्की मिळतील सर्व प्रश्नांची उत्तरं...
प्रश्न निर्माण करणारे जर आपण आहोत....
तर या प्रश्नांची उत्तरेही आपल्याकडेच असणार आहेत...
शोधायला जाताना मात्र मनाची पक्की तयारी ठेवायला हवी आहे...
कोण जाणे काय काय..दडलेलं असेल...
काय काय...हाती लागणार आहे...
अचानकपणे..धक्कादायकपणे..काही समोर आलं तर....
तर ते सहन करण्याचीही तयारी हवी...
जेवढ्या जास्त काळाचा सहवास तेवढाच...
तेवढाच जास्त पसारा आठवणींचा...
निकाली काढायचा म्हटलं तर...
अजुनाधिक त्रासच होणार...
पण म्हणुनच जरुरी आहे...
मनाला वेळच्या वेळी तपासणे...चांगल्या ह्र्द गोष्टींना जपून ठेवणे..
नकोश्या...उगचं जागा व्यापणा-या गोष्टींची वासलात लावणे..
मनाला वळण लावणं...ट्रॅकवर ठेवणं...
काय जपायचं...काय नाही हे मनाला समजवणं...
काय हवं आहे हे सांगणं...
त्या हव्याश्या वाटणा-या सुखद क्षणांच्या आठवणींसाठी स्वर्गिय कोंदण तयार करणं...
म्हणजे मग पुन्हा पुन्हा हे कप्पे शोधावे...उचकावे लागणार नाहीत...
नाही होणार मनाला त्रास...काही बोलुन गेल्याचा...नाही पडणार नात्यात गाठी..
नाही होणार कोंडमारा...मन मुक्त होउन जाईल...
नेहमीच सुखाच्या, आनंदाच्या क्षणांनी ते ओतप्रोत भरलेलं राहील..
उलट... क्षणोक्षणी सुखावून टाकील..

?
१९.७.२०१२No comments:

Post a Comment