Thursday, 2 August 2012

अस्वस्थ मन...

खुप काही वाटतय...
काहीच सुचतं नाही...
भावनांना वाट सापडत नाही...
अस्वस्थ मन...
हाताशी असूनही ....
हाताला काही जाणवतं नाही..
भास होताहेत....आभासी .....
श्वास जाणवतोय कानाशी..
आवाज एकही ऐकू येत नाही...
घनघोर पिसा-यागत...
लाटां उफ़ाळून येतात..
पावले मात्र भिजत नाही..
शून्यभारित मन..
मिटले मन काही..
काही केल्या फ़ुलत नाही
कुंद प्रहरी घाव पडती
थंड ह्र्दयी भाव...
भाव वेदनांचे शमत नाही
कोरडे अश्रू वाहती..
रित्या लोचनांत..ओलं
ओलंपण साठत नाही..
असणं ...नसल्यागत..
टोचतयं..रुततंय..
हात हाती येत नाही...
पाखर पंखाची..
गहिवर मायेचा..
दाटून येतो..देणे होत नाही...

?
२.८.२०१२

No comments:

Post a Comment