Monday, 30 July 2012

अखेरचा श्वास

तीळ तीळ मरताना..
मला तु दिसत रहातोस..
माझ्याकडे पाठ फ़िरवलेला..
मी फ़िकट हसू हसून..
सुख साजरं करते...
नाही तमा तुला माझी..
अस मी म्हणताना...
तुला मी पाहिले हळूच
अश्रू टिपताना...
नाही दिलीस शब्दांची साथ,
आणि हातात हात..
पण तु सदोदीत जवळ
वा-याच्या गंधात
पाठ फ़िरवून असलास..तरी
माहीती आहे..मला..
मी अखेरचा श्वास घेईन..
तुझ्याच ओंजळीतला..

?
२४..२०१२

No comments:

Post a Comment