Monday, 30 July 2012

?

?
खरंच एक प्रश्नचिन्ह आहे माझ्यासमोर..
हे सर्व मी लिहिलयं..
मला यातल एक अक्षरही आठवत नाही..
तुम्ही जसं वाचता तसचं मी ही ते वाचत जाते..
काही आवडतं.... काही नाही आवडतं...
काही चुकीचं वाटतं..काही समर्थनीय...
पण..जे काही जेंव्हा कधी लिहिलयं
मनात जसं आलयं तस लिहित गेली..
हे शब्द माझे झालेत ह्यांच मात्र अप्रुप वाटतं..
त्यातली गोडी..ते क्षण... ते वाचतांना...
मीही पुन्हा पुन्हा अनुभवते...
हा माझ्यासाठी..स्वत:चा ठेवा...
पहा तुम्हांला किती भावतो...
किती पटतो...
आवडल्यास खरखरं सांगा...
आणि नाही आवडल्यावर नक्की सांगा...

No comments:

Post a Comment