Monday, 30 July 2012

करता येत असेल तर कर..


करता येत असेल तर कर..
तुझ्या आयुष्यातून दूर..
करुन टाक एकदाचे
हद्दपार तुझ्या ह्रद्यातून..
कशाला बाळगतोस ओझं
माझ्या आठवणींचे..
त्याही टाक पुसून..
भग्नावशेष दे भिरकावून..
माझ्या अस्तित्वाचे..
त्या एक एक खुणांचे
इंद्रधनुषी रंग संपवून टाक..
स्वच्छ करून टाक ..
आठवणींचे काने-कोपरे..
एवढे करूनही जर
पुन्हा आठवत राहिले तर..
तर मात्र परत ये..
तर मात्र परत ये..
मी तिथेच असेन जिथे ..
जिथे तु सोडून गेलास..
मला..मला एकटीला..

?
२४..२०१२


No comments:

Post a Comment